Tuesday , August 25 2026
Breaking News

बेनाडीत रेसिंग असोसिएशनतर्फे ११ रोजी १४ लाख बक्षिसांच्या बैलगाडी शर्यतींचा थरार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील रेसिंग असोसिएशन कमिटीच्या सहकार्याने हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना आणि जोल्ले ग्रुपतर्फे बुधवारी (ता.११) सकाळी येथील शर्यती माळावर विना लाठी-काठी बैलगाडी व विविध शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १४ लाख रुपये बक्षीसाच्या या शर्यतीकडे निपाणी भागाचे लक्ष लागले आहे. एकाच ठिकाणी थांबून संपूर्ण शर्यत पाहण्यासाठी येथील शर्यती मैदान प्रसिद्ध असल्याने शर्यती दिवशी हा माळ बैलगाडी शर्यती शौकिनांनी फुलून जाण्याची शक्यता आहे.
शर्यतीमधील अ-गट बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ५ लाख रुपये, ३ लाख रुपये आणि २ लाख रुपये, ब-गट शर्यतीसाठी अनुक्रमे २ लाख रुपये, १ लाख रुपये व ५० हजार रुपयांचे बक्षीस विजेत्यांना देण्यात येणार आहे आहे. घोडा-बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ५० हजार रुपये, ३० हजार रुपये, २० हजार आणि रुपये, दुस्सा-चौसा बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ५० हजार, ३० हजार रुपये, २० हजार रुपये, नवतर व जनरल घोडागाडी शर्यतीसाठी अनुक्रमे २५ हजार रुपये, १५ हजार रुपये व १० हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. मान्यवरांच्या हस्ते शर्यत मैदानाचे उद्घाटन व बक्षीस वितरण होणार आहे. शहराची मध्ये सहभाग घेणाऱ्या बैलगाडीवानांनी बेनाडी रेसिंग असोसिएशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देवचंद कॉलेज परिसरात बाकडी

Spread the love  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *