Wednesday , June 17 2026
Breaking News

टिळकवाडी परिसरातील २ लॉजमध्ये चोरी; महिलेला अटक, एक फरार

Spread the love

 

बेळगाव : टिळकवाडी येथील दोन लॉजमधील चोरी प्रकरणांचा टिळकवाडी पोलिसांनी छडा लावला आहे. यासंबंधी संकेश्वर येथील एका महिलेला अटक करण्यात आली असून 32 लाख 86 हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आणखी एक आरोपी फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दीपा महालिंग अवटगी (वय 33) मूळची राहणार करिसिद्धेश्वर गल्ली, महालिंगपूर, सध्या राहणार एसडीव्हीएस कॉलेजसमोर, संकेश्वर असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा आणखी एक साथीदार शिवानंद ऊर्फ विनोद शंकरय्या मठपती, राहणार शंकरनगर, निपाणी रोड, संकेश्वर हा फरारी झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी, उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ, उपनिरीक्षक प्रभाकर डोळ्ळी, महेश पाटील, एस. एम. करलिंगन्नावर, नागेंद्र तळवार, सतीश गिरी, लाडजीसाब मुल्तानी, गंगव्वा पार्वती, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांच्या फेस रिडिंग हजेरी प्रणालीचा पहिलाच दिवस गोंधळात; तांत्रिक अडचणींमुळे उपस्थिती नोंदविण्यात अडथळे

Spread the love  बेळगाव : सरकारी शाळांमधील उपस्थिती व्यवस्थापन अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *