Tuesday , August 25 2026
Breaking News

५ व्या आंतर कॉलेज निमंत्रित हॉकी स्पर्धेचा शुभारंभ

Spread the love

 

बेळगाव : हॉकी बेळगावच्या वतीने पाचव्या आंतर कॉलेज निमंत्रित हॉकी स्पर्धेचा शुभारंभ माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांनी यांनी हॉकी गोल पोस्टमध्ये चेंडू मारून उद्घाटन केले. यावेळी हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमणी यानी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.
हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी संस्थेचा परिचय देऊन हॉकी स्पर्धेची माहिती दिली. या स्पर्धेत मुलांच्या संघामध्ये संगोळी रायण्णा कॉलेज, आरपीडी कॉलेज, पीपल ट्री कॉलेज, जीएसएस कॉलेज गोगटे कॉलेज व व्हीटीयू तर मुलींचा संघामध्ये संगोळी रायण्णा कॉलेज, जी एस एस कॉलेज, आरपीडी कॉलेज संघांनी सहभाग घेतला होता.
विजयी स्पर्धकांना मार्कंडेय को-ऑपरेटिव्ह सोसायटी मन्नूरच्या वतीने संस्थापक चेअरमन स्व. आर डी चौगुले यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी देण्यात येत आहेत.
यावेळी सचिव सुधाकर चाळके, नामदेव सावंत, मनोहर पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, शांताप्पा नरगुदी, श्रीकांत आजगांवकर, निखिल शिंदे रामकृष्ण गोपाळ खांडे, दत्तात्रय जाधव, सविता वेसणे, सविता हेब्बार, आशा होसमणी, प्रशिक्षक उत्तम शिंदे, राजू यल्लाप्पा देशनूर, प्रशांत मंकाळे उपस्थित होते. पंच म्हणून प्रफुल्ल, श्लोक, प्राजक्ता, विजयलक्ष्मी यांनी काम पाहिले.
संगोळी रायण्णा कॉलेज विरुद्ध आरपीडी कॉलेज मुलींच्या संघाचा आज अंतिम सामना होणार आहे.

आज बक्षिस समारंभ
बक्षिस समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार जगदीश शेट्टर, कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यनिर्वाहक मच्छलवार हरिविजय, माजी
उपमहापौर आनंद चव्हाण, कर्नाटक राज्य ओबीसी भाजपचे सचिव किरण जाधव, श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, मार्कंडेय सोसायटी मन्नूरचे चेअरमन प्रसाद चौगुले, संचालक व भाजप नेते विनय कदम आदी उपस्थित राहणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

एपीएमसी पोलिसांकडून घरफोडीच्या तीन गुन्ह्यांचा छडा; ६.११ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

Spread the love  बेळगाव : एपीएमसी पोलिसांनी घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *