Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

सार्वजनिक वाचनालय आयोजित भजन स्पर्धा उद्यापासून

बेळगाव : बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने श्रावण मासानिमित्त सोमवार दिनांक 22 ऑगस्टपासून आयोजित केलेल्या संगीत भजन स्पर्धेला उद्या प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. एस. बी. ओऊळकर यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

बेळगावातील सार्वजनिक गणेश मंडपात वीर सावरकरांचे भावचित्र लावावेत : आमदारांची सूचना

  बेळगाव : काँग्रेसने सावरकरांची प्रतिमा लावण्यास विरोध दर्शविल्यानंतर भाजप आता गणेशोत्सवात सावरकरांचे भावचित्र लावण्यास पुढे सरसावला आहे. बेळगावातही सावरकरांचे चित्र लावण्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवादरम्यान सर्व गणेश मंडळांमध्ये सावरकरांची प्रतिमा लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याच मुद्द्यावर बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय यांनी गणेशोत्सवादरम्यान …

Read More »

हिंदु सणांच्या वेळी कायद्याचा गैरवापर करणार्‍या अधिकार्‍यांना निलंबित करा!

सहसंचालक डॉ. वि. मो. मोटघरे यांचे लिखित स्वरूपात उत्तर देण्याचे आश्वासन केवळ हिंदु सणांच्या वेळी प्रदूषणविरोधी कायद्याचा गैरवापर करुन हिंदूंशी पक्षपात करणार्‍या ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या सर्व संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांची शीव (मुंबई) येथील कार्यालयात भेट घेतली. …

Read More »

लैला शुगर्सकडून दुसरा हप्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात

  अध्यक्ष विठ्ठलराव हलगेकर यांनी दिली माहिती खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील महालक्ष्मी ग्रूप संचालित लैला साखर कारखाण्याचा दुसरा हप्ता १७५ रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती लैला शुगर्स कारखान्याचे अध्यक्ष, श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. …

Read More »

शाळांमध्ये बालगोविंदांने फोडली दहीहंडी!

राधा कृष्णाच्या वेशभूषांनी शाळा गजबजल्या : विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी विविध तरुण मंडळ आणि शाळांमध्ये गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त दहीहंडीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालगोपाळांनी दहीहंडी फोडून जल्लोष साजरा केला तर राधा कृष्णाच्या वेशभूषांनी शाळांचा परिसर गजबजून गेला होता. …

Read More »

हिमाचल प्रदेश काँग्रेस सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा आनंद शर्मा यांनी दिला राजीनामा!

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी आज हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले की, ते त्यांच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तडजोड करू शकत नाहीत. महत्त्वाच्या बैठकांना आमंत्रित न केल्यामुळे आनंद शर्मा हे काँग्रेसमध्ये दुर्लक्षित आणि …

Read More »

‘ना नफा ना तोटा’ अथर्व फाउंडेशनची दुसरी लॅब बेळगावात सुरु

  बेळगाव : अथर्व फाउंडेशन या संस्थेच्या वतीने गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला सोमवार पेठ टिळकवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या लॅबोरेटरीला मिळालेला प्रतिसाद आणि शहरी विभागातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन अथर्वच्या वतीने कडोलकर गल्ली बेळगाव येथे रविवारी आणखी एक रक्त-लघवी कलेक्शन केन्द्राचा प्रारंभ करण्यात आला. उत्तर विभागाचे आमदार अनिल बेनके व …

Read More »

टिपू सुलतान चार वेळा इंग्रजांविरुद्ध लढले, सावरकरांनी चार वेळा माफी मागितली : असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये शिवमोगा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिपू सुलतान यांचे फलक लावण्यावरून १५ ऑगस्ट रोजी दोन गटांत मोठा वाद झाला. या वादामध्ये एकावर चाकूहल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाल्यामुळे जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, याच घटनेचा संदर्भ देत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी …

Read More »

निपाणीत २८ रोजी माऊली अश्वाचा गोल, उभा रिंगण सोहळा

निपाणी (वार्ता) : विठू माऊली व श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांच्या आशीर्वादाने निपाणीत प्रथमच श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अश्वाचे गोल व उभे रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रिंगण सोहळा रविवारी (ता. २८) दुपारी म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर होणार आहे. याचा लाभ निपाणीसह परिसरातील वारकरी भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्रीमंत …

Read More »

निपाणीवासीयांना लवकरच २४ तास पाणी

मंत्री शशिकला जोल्ले : जवाहर तलावावर गंगापूजन निपाणी (वार्ता) : यावर्षी निसर्ग आणि पावसाने चांगली साथ दिल्याने शहरवासीयांना पाणीपुरवठा करणारा येथील जवाहर तलाव भरून ओसंडून वाहत आहे. त्या पाण्याचे पूजन आता झाले असून लवकरच शहर आणि उपनगरातील सर्वच विभागाला २४ तास पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री शशिकला जोल्ले यांनी …

Read More »