Saturday , May 2 2026
Breaking News

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे युवकाचे डोळे निकामी; मदतीचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करताना एका युवकाचा डोळा निकामी झाल्याची दुर्दैवी घटना गेल्या रविवारी भारतनगर परिसरात घडली असून “त्या” युवकावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. त्याच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे दुसरा डोळा वाचवण्यासाठी परिसरातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
शिवा नारायण लोहार (वय ३२) राहणार नवी गल्ली, शहापूर असे त्या युवकाचे नाव आहे. तो गेल्या चार-पाच वर्षांपासून भारतनगरच्या प्रत्येक कार्यात सहभागी असतो.
भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामना सुरू होता. सामन्यानंतर भारत विजयी झाला. उत्साहाच्या भरात काही जणांनी फटाके आणले. आतषबाजी सुरू असताना शिवाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. क्रिकेट सामना पाहिल्यानंतर होळीची तयारी करायची म्हणून सर्व कार्यकर्ते बसले होते. त्याआधीच ही घटना घडली. त्याला तातडीने खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले.

शिवा हा भारतनगरच्या लंबोदर श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता. परिसरातील कार्यकर्त्यांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. खासगी इस्पितळात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. उजवा डोळा निकामी झाला. डावा डोळा वाचवायचा असेल तर पुन्हा एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी खर्चही मोठा आहे. लहान कौलारू घरात आई व शिवा हे दोघेच राहतात. त्याच्या दोन बहिणी आपापल्या सासरी राहतात. परिसरातील कार्यकर्त्यांचाच त्याला आधार आहे. वृद्ध आईचा सांभाळ करण्यासाठी तो दिवसभर चिकन दुकानात काम करतो. कधी कधी रिक्षा चालवतो. आता त्याचा एक तरी डोळा वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे. यासाठी मदतीचेही आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जायंट्स सखीच्या वतीने अवयवदान जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

Spread the love  बेळगाव : येथील श्री छत्रपती शिवाजी उद्यान येथे जायंट्स सखीच्या वतीने अवयवदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *