Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

मुंबई विजयी, दिल्ली प्लेऑफच्या बाहेर

मुंबई : पाच वेळेचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने आपल्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर 5 विकेटस्नी विजय मिळवून आयपीएल 2022 चा शेवट गोड गेला. या सामन्यात पराभूत झाल्यामुळे दिल्लीचे प्ले ऑफ फेरीत पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावले. मुंबईचे आव्हान या आधीच संपुष्टात आले असले तरी त्यांच्या विजयाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ प्ले …

Read More »

प्रभाग १३ ची माळ कोणाच्या गळ्यात…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने मतदान पार पडल्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले दिसत आहे. निवडणुकीत कोण जिंकणार, कोण हरणार याकरिता तर्कवितर्क लढवले जात आहेत. येथे प्रथमच सर्वाधिक ७७% मतदान झाल्यामुळे याचा लाभ कोणाला मिळणार. याविषयी बरीच चर्चा केली जात आहे. तसे पाहिले …

Read More »

नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे रेडक्रॉस जिल्हा संघटनेकडून स्वागत

बेळगाव : भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन केले. तसेच जिल्हाधिकारी हे जिल्हा रेडक्रॉस संघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळे त्यांना जिल्हा संघटनेची माहिती देण्याबरोबरच बीम्समधील संघटनेच्या खोल्या अबाधित ठेवण्याची विनंती केली. भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव …

Read More »

ग्राहकांना दिलासा! पेट्रोल ८ तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलची किंमत आता स्वस्त झाले आहेत. पेट्रोल ८ रुपयांनी तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठी दिलासा मिळाला आहे. आता केंद्रा पाठोपाठ राज्यांनींही पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी करावी अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. एकीकडे महागाईमुळे सामान्य जनता होरपळली जात …

Read More »

टेम्पो चालकाचा मुलगा राज्यात अव्वल!

हुन्नरगीत दिवाळी : वडीलांच्या कष्टाचे केले चीज निपाणी (विनायक पाटील) : अत्यंत गरिबी परिस्थितीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दररोज कसरत होत आहे. अशातच शिक्षणासाठी वाढलेला खर्च सर्वसामान्य कुटुंबांना पेलवत नाही. तरीही आपल्या मुलांना शिक्षण देण्याची जिद्द ठेवून  हुन्नरगी येथील टेम्पो चालक दत्तात्रय शिवाप्पा किल्लेदार यांनी टेम्पोवर चालक म्हणून काम करून आपल्या …

Read More »

महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी समन्वय राखा : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची सूचना

बेळगाव : नजीकच्या काळात पावसामुळे शेजारील महाराष्ट्रातील जलाशयातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या राज्यातील संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क ठेवणे आवश्यक आहे. याबाबत बेळगाव जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना पर्जन्यमान, जलसाठा आणि इतर बाबींच्या माहितीची सतत देवाणघेवाण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिल्या आहेत. संभाव्य पूर व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीसंदर्भात आज शनिवारी आयोजित …

Read More »

संभाजीराजेंनी शिवबंधन बांधून राज्यसभा लढवावी; पहिल्यांदाच शिवसेनेकडून ‘ओपन ऑफर’

मुंबई : राज्यसभेसाठी सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आज पहिल्यांदाच यासंदर्भात संजय राऊतांनी उघडपणे भाष्य केलं. त्यामुळे आता संभाजीराजे …

Read More »

भ्रष्‍टाचारप्रकरणी हरियाणाचे माजी मुख्‍यमंत्री ओम प्रकाश चौटाला दोषी, २६ रोजी न्‍यायालय सुनावणार शिक्षा

नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्‍यमंत्री ओम प्रकाश चौटाला हे उत्‍पन्‍नापेक्षा अधिक मालमत्तेप्रकरणी दोषी ठरले आहेत. याप्रकरणी २६ मे रोजी न्‍यायालय शिक्षा सुनावणार आहे. याकडे हरियाणातील राजकीय वुर्तळाचे लक्ष वेधले आहे. १९९७ मध्‍ये भ्रष्‍टाचार प्रकरणी सिरसा येथे गुन्‍हा दाखल झाला होता. याप्रकरणी २००६ मध्‍ये सीबीआयने गुन्‍हा दाखल केला होता. २०१० …

Read More »

एकसंघ होऊन निवडणूक लढविण्याची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची सूचना

बेळगाव : वायव्य पदवीधर मतदार, शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित नेत्यांना सर्वांनी एकसंघ होऊन निवडणूक लढविण्याची कडक सूचना प्रल्हाद जोशींनी दिली. बेळगाव जिल्ह्यात भाजपात दुफळी झाल्याचे दिसून येत आहे. या दुफळी मोडीत काढून पक्ष …

Read More »

बेळगाव भाजपमधील दुफळीच्या चर्चेला पालकमंत्र्यांच्या दुजोरा!

बेळगाव : बेळगाव भाजपमध्ये दुफळीचे राजकारण सुरु असल्याची बाब सर्वश्रुत आहे. आता या गोष्टीला स्वतः पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दुजोरा दिला आहे. बेळगाव जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये दुफळी असूनही आजच्या प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखालील बैठकीला सर्व नेत्यांची उपस्थिती असल्याचे पालकमंत्री म्हणाले. बेळगाव भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरु असल्याची चर्चा सुरु असून या …

Read More »