Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

नामफलकांवर 60 टक्के कन्नड भाषेचा वापर अनिवार्य : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात कन्नड भाषा समग्र विकास विधेयक-2022 च्या योग्य अंमलबजावणीबरोबरच प्रत्येक दुकानासमोरील नामफलकांवर 60 टक्के कन्नड भाषेचा वापर व्हावा यासाठी अधिकाऱ्यांनी पावले उचलावीत, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी कन्नड भाषा समग्र विकास विधेयक-2022 ची अंमलबजावणी आणि नामफलकांवर कन्नड भाषेचा …

Read More »

समितीला तळागळात पोचविण्यासाठी वॉर्डनिहाय कार्यकारिणी करणे गरजेचे

  बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत विधानसभा मतदारसंघनिहाय उत्तर व दक्षिण विभागातील युवकांना प्राधान्य देण्यात आले असून यामध्ये जुन्याजाणत्या नेत्यांसोबत नव्या दमाच्या तरुण कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात आले आहे. म. ए. समिती तळागाळात पोचविण्यासाठी नवीन कार्यकारिणी प्रयत्न करेल, अशी आशा समिती कार्यकर्ते व्यक्त …

Read More »

भीमा शंकर सहकारी बँक चोरी प्रकरणी 6 चोरट्यांना अटक

  विजयपूर : विजयपूर जिल्ह्यातील चडचण जवळील धुळखेड गावातील श्री भीमाशंकर सौहर्द सहकारी बँकेतून १९ लाख ५५ हजारांची रोकड घेऊन पळून गेलेल्या ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनावणे यांनी दिली. आरोपींकडून २७ लाख १५ हजार रुपयांची ३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. रविवारी …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे वधू-वर मेळावा उत्साहात

  बेळगाव : मराठा समाजाने लग्नाचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करत वेळेत लग्न लावावे. त्याचप्रमाणे हल्ली दोन दोन वेळा अक्षतारोपण करण्याची नवी प्रथा मराठा समाजामध्ये पडली आहे. त्यामुळे मराठा समाजाबद्दल चुकीचा संदेश इतर समाजात पसरत आहे. मुहूर्तावर आणि एकदाच वधू-वरांचे लग्न लावण्याची जबाबदारी वधूवरांच्या पालकांनी घ्यावी, असे मत मराठा समाजाचे अध्यक्ष …

Read More »

बस खाली सापडून वृद्ध महिला जागीच ठार; चन्नम्मा सर्कल जवळील घटना

  बेळगाव : रस्ता ओलांडताना परिवहन मंडळाच्या बस खाली सापडून एक वृद्ध महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, ग्रामीण भागातून बेळगाव शहरात आलेली ही 60 वर्षीय महिला चन्नम्मा सर्कल येथे डावीकडून उजवीकडे रस्ता ओलांडत होती. …

Read More »

धजद – भाजपची स्वार्थासाठी अपवित्र युती

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; बंगळूरात शिक्षक कौतुक परिषद बंगळूर : धर्मनिरपेक्ष जनता दल (धजद) आणि भारतीय जनता पत्र (भाजप) यांच्यातील युती अपवित्र असल्याची टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली, माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वासाठी ही युती केल्याचा त्यांनी आरोप केला. केंगेरी येथील शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे पुट्टण्णा निवडून आल्याबद्दल बंगळुरच्या …

Read More »

सात वर्षात राज्यात ६० हजार मेगावॅट वीज निर्मिती : मुख्यमंत्री सिध्दरामय्या

  बंगळूर : येत्या सात वर्षात राज्यात ६० हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भविष्यात शेतकऱ्यांना अधिक पुरवली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी सांगितले. शनिवारी बंगळुर कृषी विद्यापीठ कॅम्पस जीकेव्हीके येथे ऊर्जा विभागातर्फे आयोजित ‘रयत सौर शक्ती मेळा’, ‘कुसुम’ बी आणि सी प्रकल्प आणि नवीन वीज उपकेंद्रांच्या …

Read More »

चलवेनहट्टी येथे पाणी पुरवठा समितीसह पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांची निवड

  बेळगाव : चलवेनहट्टी येथील कायमस्वरूपी पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून बढती मिळाल्याने गावात पाणी पुरवठा कर्मचाऱ्याची कमतरता प्रकर्षाने जाणवत होती. तसेच पाणी पुरवठा समितीचीर फेर निवड करण्यात आली असून तीन वर्षांपूर्वी घाईगडबडीत ग्रामस्थांना विश्वासात न घेता पाणी पुरवठा समितीचे निवड करण्यात आली होती तरी सदर निवडीबद्दल गावातील युवकांनी …

Read More »

कालकुंद्रीत टस्कर हत्तीने केले दुचाकीचे नुकसान; हत्तीचा परतीचा प्रवास तेऊरवाडीच्या जंगलात

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गेल्या २५ फेब्रुवारीपासून चंदगड तालुक्याच्या पूर्व भागासह कर्नाटक सीमाभागात भ्रमंती करणारा टस्कर हत्ती आज पहाटे ४ वाजता थेट कालकुंद्री गावात शिरला. २५ फेब्रुवारी रोजी हाच हत्ती प्रथम कालकुंद्री येथेच ग्रामस्थांना दिसला होता. त्यानंतर १५ दिवसांनी आज सकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, खंडोबा गल्ली …

Read More »

पोहण्यासाठी गेलेल्या वडिलाचा दोन मुलांसह पाण्यात बुडून मृत्यू

  बेळगाव : शेत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पिता आणि दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रायबाग तालुक्यातील निडगुंदी गावात रविवारी घडली. कल्लाप्पा बसप्पा गानिगेर (वय 36) आणि मुलगे मनोज कल्लाप्पा गानिगेर (वय 11) आणि मदना कल्लाप्पा गानिगेर (वय 9) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मित्राच्या शेत तलावात आपल्या मुलांना घेऊन …

Read More »