खानापूर (प्रतिनिधी) : बिडी (ता. खानापूर) येथील रयत संपर्क केंद्रात शेतकरी वर्गासाठी भाडोत्री कृषी यंत्रसामुग्रीचे उद्घाटन सोहळा रविवारी दि. १४ रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अंजली निंबाळकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ंटी कृषी निर्देशक शिवनगौडा पाटील, उपकृषी निर्देशक एच. डी. कोळेकर, ग्राम पंचायत अध्यक्षा शांता कुंडेकर, उपाध्यक्ष अंबुतली बैलहोंगल, सदस्य डॉ. जवळी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी खानापूर तालुका कृषी कार्यनिर्वाहक अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कृषी यंत्रणाचे पुजन करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी ट्रॅक्टर चालवून यंत्रणाचे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, शेतकरी बंधूनी सरकारच्या कृषी यंत्राणाचा भाडेत्वावर लाभ करून घ्यावा व आपली प्रगती साधावी असे सांगितले.
कार्यक्रमाला कृषी अधिकारी डी. एच. राठोड, सहाय्यक कृषी अधिकारी आर. जी. कोलकार, मंजुनाथ कुसगल, लक्ष्मी कडपणावर, प्रदिप, मंजुनाथ व बिडी भागातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
शेवटी आभार एच. डी. राठोड यांनी मानले.
