खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी शहरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप व लैला शुगर यांच्या संयुक्तविद्यमाने सुरू करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला भेट देऊन समाधान व्यक्त केले.
यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व पीएलडी बॅंकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, बाॅड राईटर शामराव पाटील, महादेव घाडी आदीनी रविवारी श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला भेट देऊन प्रत्येकी पाच पाच हजार रूपयाची देणगी देऊ केली.
यावेळी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरचे अध्यक्ष भाजप नेते किरण येळ्ळूरकर, सचिव सदानंद पाटील, पंडित ओगले, चापगाव ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष रमेश धबाले, सुनिल मडीमन्नी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरबद्दल कौतुक केले. तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांना केलेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.
Check Also
येळ्ळूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
Spread the love येळ्ळूर : श्री सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार मंडळाच्या पुढाकाराने व बेळगाव पंचक्रोशीतील असंख्य …