बेळगाव : बेळगावातील मराठी पत्रकार संघ आणि जिव्हाळा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हा रुग्णालय आवारातील आय.एम.ए. सभागृहात गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कोरोना काळात विशेष सेवा बजावलेल्या पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे.
कोरोना काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, धोका पत्करून कर्तव्य बजावलेल्या मराठी आणि कन्नड पत्रकारांचा मराठी पत्रकार संघ आणि जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर आणि जिव्हाळा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पोटे यांनी दिली आहे.