खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव जिल्ह्यातील गवळी धनगर समाज हा पिढ्यानपिढ्या येथील रहिवासी असून त्यांना वन जमिनीचा ताबा कायम मालकी हक्काने मिळाला पाहिजे, यासाठी वन अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याबाबत चळवळीची दिशा निश्चित करण्यासाठी सोमवार दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता येथील रवळनाथ मंदिरात बैठक बोलविण्यात आली आहे. ही बैठक खानापूर तालुक्यातील गवळी धनगर समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसाठी आयोजित केली आहे. या बैठकीला श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई व डॉ. अविनाश भाले मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
मागच्या कांही दिवसात शेजारच्या हल्ल्याळ तालुक्यातील गवळी धनगर समाजातील कुटुंबांची शेती कायदा धाब्यावर बसवून वनविभागाने पोलिसांच्या मदतीने उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्याला तिथल्या कुटुंबानी तीव्र विरोध केला. भविष्यात ही टांगती तलवार खानापूर तालुक्यातील गवळी धनगर समाजावर केव्हाही येऊ शकते म्हणून याबाबत कायदा आणि चळवळ याची सांगड घालून पुढे कसे जायचे याचा निर्णय या बैठकीत होणार आहे. तरी या बैठकीला सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समितीचे निमंत्रक महादेव मरगाळे यांनी केले आहे.
Check Also
बेळगांवहून निघालेला डिझेल टँकर कॅसलरॉकजवळ पलटी
Spread the love रामनगर : जोयडा तालुक्यातील कॅसलरॉक येथे कलंबली क्रॉसजवळ डिझेलने भरलेला टँकर पलटी …