खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे 9 ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला खानापूरातून पाठिंबा दिला, तसेच तो यशस्वी करण्यासाठी खानापूर युवा समितीने घेतलेला निर्णय योग्य असून मराठी प्रेमी जनतेने तो यशस्वी करावा. अशे आवाहन पत्रक लिहून आम्ही यशस्वी करू. यावेळी शरद हणमंत पाटील, शंकर बाळाराम पाटील, गंगाराम विष्णू पाटील, कृष्णा नारायण पाटील, नारायण सातेरी पाटील, पुंडलिक पाटील, मनोज ज्योतिबा पाटील, जोतिबा लक्ष्मण पाटील, परशराम शिवाजी गुंजीकर, कल्लाप्पा भैरू पाटील, एकनाथ गणपती पाटील, जितेश हनमंत पाटील, रवींद्र पांडुरंग पाटील ,नारायण हणमंत पाटील, राजेंद्र शाहू पाटील, परशुराम दे पाटील, हनुमंत अर्जुन झेंडे व आदी उपस्थित होते.
Check Also
खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूक २७ रोजी; दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव
Spread the love खानापूर : खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा …