खानापूर (वार्ता) : शहरासह ग्रामीण भागात साथीच्या आजारांचा प्रभाव वाढला आहे. याकडे लक्ष देऊन साहेब फाऊंडेशनच्यावतीने रोगप्रतिबंधक औषध वितरण करण्यात येत आहे. काल गुरुवारी खानापूर तालुक्यातील कुसमळी गावात रोगप्रतिबंधक डोस मोहीम राबविण्यात आली.
साहेब फाऊंडेशनच्या संस्थापिका श्रीमती उज्वला संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाद्वारे गेल्या वर्षी कोरोना काळात आरोग्य उत्सव उपक्रम आयोजित करण्यात आला होता. आरोग्य उत्सव उपक्रमांतर्गत शहापूर, वडगाव, खासबाग, भारतनगर परिसरातील तब्बल 50 हून अधिक सार्वजनिक उत्सव गणेश मंडळांना ऑक्सीमीटर वाटप करण्यात आले. त्याचबरोबर गेले नऊ दिवस सांस्कृतिक भवन येथे येणार्या नागरिकांना थर्मल स्किनिंग, ऑक्सिजन चेकिंग, डेंग्यू लस, रक्तदान, ऑक्सीजन सिलेंडर सेवा देण्यात आली होती.
त्यानंतर यावर्षीही कोरोना बरोबरच अलीकडच्या काही दिवसात बेळगाव शहर उपनगर आणि ग्रामीण परिसरात साथीच्या आजारांचा प्रभाव वाढला आहे. याकडे लक्ष देऊन साहेब फाऊंडेशनच्या वतीने रोगप्रतिबंधक डोस मोहिमेचा राबविण्यात येत आहे. काल गुरुवारी कुसमळी गावातील लक्ष्मी मंदिरात गावकर्यांना रोगप्रतिबंधक डोस देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा पाटणेकर, विशाल पाटणेकर, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा खानापूर तालुका जनरल सेक्रेटरी पवन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अनंत सावंत, विलास गायकवाड, प्रवीण देसाई, संदीप कालकुंद्रीकर, हनुमंत देसाई, बाबुराव पाटील, चंद्रकांत पाटील, तिळाजी पाटील, सुरेश पाटील, प्रसाद दळवी यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
टेनिस हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी मराठा मंडळ ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड
Spread the love खानापूर : मराठा मंडळ ही शिक्षण संस्था क्रीडा स्पर्धेत खेळाडू विद्यार्थ्यांना नेहमीच …