खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबाटी महामार्गाचे 5 कोटी रूपयाचे अनुदान मंजुर करून पारिश्वाड ते खानापूरातील शिवाजी नगरापर्यंतचे काम करण्यात आले. मात्र जांबोटी क्रॉसवर डांबरीकरणांचे काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यातच खानापूर-जांबोटी क्रॉसवरच्या प्रवेशद्वारावरच खड्डा पडून पाणी साचले आहे. त्यामुळे येथून ये-जा करणार्या प्रवाशाना तसेच वाहन चालकाना या खड्ड्यातून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष होत आहे.
——
पारिश्वाड ते खानापूर पर्यंतच्या जत-जांबोटी रस्त्याच्या कामात तफावत झाली आहे. परिश्वाडपासून रस्त्याचे रूंदीकरण 60 फूट आहे. खानापूर शहरात रूंदीकरणात तफावत करण्यात आली आहे. खानापूरात 60 फूट रूंदीचा रस्ता नाही आहे. या मागचे गौडबंगाल काय?
– रेव्हनसिध्दया हिरेमठ, जेडीएस नेते.
——-
जांबोटी क्रॉसवरील खड्डा हा मृत्यूला आमंत्रण देणारा खड्डा आहे. या खड्ड्यांमुळे कुणाचा तरी जीव गेला तर या कारणीभूत लोकप्रतिनिधी असतील काय?
– सुनिल नाईक, भाजपा शहर अध्यक्ष.
———
Check Also
शिरोली येथील बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा; डॉ. अंजली निंबाळकर यांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील शिरोली येथील सर्वे नंबर 97 मध्ये खासगी जमिनीत बेकायदेशीररित्या …