बेंगळुरू : खानापूरच्या आम. डॉ अंजली निंबाळकर यांनी आज शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेतली. यावेळी आम. निंबाळकर यांनी मुख्यमंत्री बोम्माई यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील विविध समस्या आणि विकासकामासंदर्भात चर्चा ही केली.
खानापूर मतदार संघातील विविध समस्या त्याचबरोबर नियोजित विकासकामे यासंदर्भात चर्चा करतानाच प्रामुख्याने अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यात आलेल्या महापूराने मोठी हानी झाली आहे त्यासंदर्भात चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी खानापूर तालुक्याचा दौरा करावा अशी विनंती आहे. यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना खानापूर तालुका दौरा निश्चित केला जाईल. या दौर्यादरम्यान नंदगड येथील संगोळी रायान्ना समाधी स्थळाला आहे भेट देऊ. महापुरातील नुकसान अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री बोम्माई यांनी दिले आहे, अशी माहिती आम. निंबाळकर यांनी दिली आहे.
Check Also
काळ्या दिनासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जांबोटी विभागात जनजागृती
Spread the love खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने …