बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना बेळगाव आणि चंदगड ते आंबोलीच्या रस्त्याबाबत एक निवेदन सादर करत मोठी मागणी केली आहे.
बेळगाव ते सूळगा, बाची चंदगड ते आंबोली या 127 किलोमीटर रस्त्याचा नवीन राष्ट्रीय महामार्ग इंटर कॉरिडॉर रूट अंतर्गत भारतमाला परिवहन प्रोजेक्टमध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी केली आहे.
अनिल बेनके आणि राजेश पाटील या दोघा आमदारांनी दिल्ली मुक्कामी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन बेळगाव आंबोली रस्त्याचा विकास करा अशी मागणी केली.
बेळगाव आंबोली या रस्त्याचा विकास झाल्यास कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील सीमेवरील लोकांचा औद्योगिक विकास झपाट्याने वाढण्यास मदत होणार असून वाहतूक कारखाने इंडस्ट्रियल आणि शेती फाउंड्री रोजगार या सगळ्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या शिवाय बेळगाव-चंदगड भागाचा आर्थिक विकास वाढीसाठी उपयुक्त होणार आहे त्यामुळे या रस्त्याचा विकास करावा, अशी मागणी त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही आमदारांच्या निवेदनाची दखल घेत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी लवकरच आर्थिक तरतूद झाल्यावर बेळगाव ते आंबोली या रस्त्याचा विकास केला जाईल असे ठोस आश्वासन दिले आहे.
चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचे वडील कै. नरसिंगराव पाटील यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. अनिल बेनके हे मूळचे चंदगडचे आहेत त्यामुळे या आमदार द्वयींनी नितीन गडकरी यांच्याशी चांगली ओळख आहे त्यातच उत्तरचे आमदार भाजपचे आहेत त्यामुळे या रस्त्याबाबत निवेदनाची दखल घेताना गडकऱ्यांनी ठोस आश्वासन दिले आहे.
