बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षांच्या सक्तमजुरीची कठोर शिक्षा सुनावली आहे. ऋतेश अनिल भोसले (वय २२, रा. कंग्राळी बुद्रुक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर अत्याचार आणि मारहाणीचा गुन्हा सिद्ध झाला आहे.
काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२५ मध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपीने पीडित मुलीच्या हतबलतेचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला होता आणि याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या गंभीर प्रकरणी काकती पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
Belgaum Varta Belgaum Varta