
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत बालहक्क कायदा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात प्रमुख पाहुणे शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, राजा लखनगौडा लॉ कॉलेजच्या राजश्री पुरोहित संचिता पाटील या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती ओमकार भारत माता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. नुकताच संप्पन झाला. यानंतर पोक्सा कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा, बालकामगार प्रतिबंध कायदा, बालसुरक्षा कायदा याबद्दल कायदेशीर जागरुकतेबद्दल
राजश्री पुरोहित व संचिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यानी पोक्सा कायद्याबद्दल तसेच कायदा व त्याचे नियम इत्यादी विषयी माहिती सांगीतली, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी यांनी सरकारने विद्यार्थ्यांच्यासाठी जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले व त्याचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनीही प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाला इयत्ता आठवी व नववीच्या 250 हुन अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार रूपा कुमठाकर यांनी मानले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta