Saturday , March 7 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 7 मार्च 2026 रोजी सदिच्छा समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘पाखरांनो घ्या उंच भरारी’या प्रेरणा गीताने केली. यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी सान्वी मंडोळकर हिने केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी प्रा.प्रसाद वाडेकर उपस्थित होते.शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर व उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील उपस्थित होते. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थिनी आदिती शिंदे हिने प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पाचवीचे विद्यार्थी श्रीशा पेडणेकर व हर्ष पावशे यांनी आपले विचार व्यक्त केले. यानंतर सोहम हळदणकर, अनुष्का पाटील, श्रेया घोळसे, श्रावणी राजगोळकर, स्वरा पाटील, स्नेहा हिरोजी, श्रेया भातकांडे, अनिकेत जाधव या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले. यश म्हणजे नवीन गोष्टी शिकणे, नवी स्वप्ने बघणं, संकटांना सामोरे जाणे, योग्य निर्णय घेणे, शिस्त, सवयी, नियोजन हे समजावण्यासाठी उदाहरणे देऊन तसेच माजी विद्यार्थी नाळ जपून ठेवल्याबद्दल शाळेचे आभार मानले तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांनी प्रा.प्रसाद वाडेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये आभार व्यक्त केले. मुलांना ध्येयापर्यंत जाण्यासाठी समर्पक असा संदेश शाळेतील शिक्षिका शैला पाटील यांनी दिला. शाळेने दिलेली शिदोरी पुढे घेऊन जाणे, प्रामाणिकपणे प्रयत्न करणे तसेच कोणतेही यश गाठत असताना मनापासून प्रयत्न करणे असे अध्यक्षीय मनोगतात शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर व शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यांनी विचार मानले व दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या.माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीसांची घोषणा केली. आदर्श विद्यार्थी म्हणून सोहम सतीश हळदणकर व‌ आदर्श विद्यार्थिनी म्हणून स्नेहा यल्लाप्पा हिरोजी यांची निवड करण्यात आली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला शैक्षणिक साहित्यासाठी देणगी दिली. सूत्रसंचालन‌ व आभार पाचवीच्या विद्यार्थिनी आदिती परमोजी व अवधूत देवळी यांनी केले. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मंजुषा पाटील व शाहीन शेख या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने पार पाडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, दहावीचे शिक्षक बी.एम्. पाटील, इंद्रजीत मोरे, सविता पवार, सुरेश कुंदेकर, शिल्पा गर्डे, डी.एस्. मुतकेकर व सर्व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन विद्यार्थी रोहित पाटील याने केले.

About Belgaum Varta

Check Also

“सागरा प्राण तळमळला…” सेल्युलर जेल किरण जाधव यांची भेट!

Spread the love  ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचा योग ‘अंदमान, निकोबार’ ही नावे ऐकताच माझ्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *