Sunday , March 8 2026
Breaking News

प्रशांत खन्नूकर ठरला ‘गोरल क्लासिक येळ्ळूर -2026’चा टायटल विजेता

Spread the love

 

बेळगाव : मेणसे फिटनेस क्लब, येळ्ळूर यांच्यातर्फे बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित ‘गोरल क्लासिक येळ्ळूर -2026’ या बेळगाव जिल्हा पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेचे विजेतेपदाचे टायटल नेक्स्ट लेव्हल जिमच्या प्रशांत खन्नूकर याने पटकावले. त्याचप्रमाणे जीम स्तरावरील ‘मेणसे फिटनेस टॉप -5’ या शरीर सौष्ठव स्पर्धेच्या जेतेपदाचा मानकरी येळ्ळूरचा संजय बस्तवाडकर हा ठरला.

गोरल गल्ली, येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील संयुक्त महाराष्ट्र चौक येथे उपरोक्त स्पर्धा नुकत्याच यशस्वीरित्या पार पडल्या. आयबीबीएफच्या नियमानुसार 55 ते 75 किलो पर्यंतच्या विविध वजनी गटात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्या नेक्स्ट लेव्हल जिमच्या प्रशांत खन्नूकर याला भव्य करंडकासह आकर्षक रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले गेले. स्पर्धेतील ‘बेस्ट पोझर’ किताबाचा मानकरी ठरलेल्या मंथन जिमचा किशोर पुजारी याच्यासह जीम स्तरावरील ”मेणसे फिटनेस टॉप -5′ स्पर्धेतील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना देखील रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष गंगाधर एम., सरचिटणीस हेमंत हावळ, आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धनावर, सुनील राऊत, मयूर मेणसे, उमेश सांबरेकर आदींसह मेणसे फिटनेस क्लबच्या संचालक व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपरोक्त स्पर्धांचा अंतिम निकाल खालील प्रमाणे आहे.

गोरल क्लासिक येळ्ळूर -2026 (गटवार अनुक्रमे पहिल्या पाच क्रमांकाचे विजेते) : 55 किलो गट – केतन भातकांडे (युनिव्हर्सल जिम), ओमकार मासेकर (स्लिम फिट येळ्ळूर), शुभम चौगुले (फिट प्रो मच्छे), स्वयम चौगुले (बॉडी वर्क्स), कल्पेश कुंडेकर (मेणसे फिटनेस). 60 किलो गट – संजय बस्तवाडकर (मेणसे फिटनेस), अक्षय मुतकेकर (रॉ फिटनेस), साईनाथ नार्वेकर (फ्लेक्स जिम गणेबैल), श्रीहरी बेळगावकर (व्ही स्क्वेअर), तुषार गावडे (रुद्रा जिम). 65 किलो गट : अविनाश परीट (सिद्धांत जिम निपाणी), नितेश गोरल (आयुर जीम), योगेश भडगावी (एएन फिटनेस), विनायक तेजम (स्लिम फिट), चेतन पेडणेकर (मेणसे फिटनेस). 70 किलो गट – सुनील भातकांडे (पॉलीहायड्रॉन), किशोर पुजारी (मंथन जिम), संकेत सुरतेकर (एसआरएस जिम), अनगोळ तेजस जाधव (रॉ फिटनेस), भुवन खराडे (रॉ फिटनेस). 75 किलो गट – प्रताप कालकुंद्रीकर (पॉलिहाइड्रॉन), बसाप्पा होनकेरी (हिंडाल्को), गजराज पाटील (फिट प्रो), श्रीधर हंडे (बाल हनुमान), सुहास दिवटे (इलाईट फिटनेस). 80 किलो गट – प्रशांत खन्नूकर (नेक्स्ट लेव्हल जिम), योगेश पाटील (नेक्स्ट लेव्हल), अक्षा लोहार (अल्फा फिट) हर्षद पाटील (रॉ फिट), मनीष सांबरेकर (हनुमान तालीम). 80 किलोवरील वजनी गट – विशाल चव्हाण (लाईफ टाईम फिट), गजानन काकतीकर (बाल हनुमान), किरण जाधव (रॉ फिट), किरण कंग्राळकर (सेंट्रल फिटनेस), बबन एम. कंग्राळकर (येळ्ळूर). टायटल विजेता : प्रशांत खन्नूकर (नेक्स्ट लेव्हल जिम), बेस्ट पोझर : किशोर पुजारी (मंथन जिम).

मेणसे फिटनेस टॉप -5 : संजय बस्तवाडकर, ओमकार मासेकर, अक्षय जोगानी, चेतन पेडणेकर, कल्पेश कुंडेकर.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण, जननी ट्रस्टतर्फे १४ रोजी कर्तृत्ववान महिलांचा गौरव

Spread the love बेळगाव : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजात स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *