Sunday , March 8 2026
Breaking News

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलक खटल्यातील आरोपींचे जबाब नोंद

Spread the love

 

बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलक प्रकरणातील दोन खटल्यांची आज बेळगावच्या दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयात सुनावणी झाली. यापैकी एका खटल्यात युक्तिवादानंतर आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले, तर दुसऱ्या खटल्यात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण होऊन प्रकरण निकालासाठी राखीव ठेवण्यात आले.

नामफलक प्रकरणाशी संबंधित खटला क्रमांक १२२/१५ आणि १२६/१५ यांची आज सुनावणी झाली. खटला क्रमांक १२२/१५ मध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर आरोपींचे जबाब न्यायालयाने नोंदवून घेतले. या प्रकरणात वारंवार गैरहजर राहणाऱ्या प्रवीण मारुती धामणेकर या आरोपीला न्यायालयाने खटल्यातून वगळले.

या खटल्यात सुरुवातीला एकूण ४७ आरोपी होते. त्यापैकी तिघांचे निधन झाले असून यापूर्वी सहा आरोपींना खटल्यातून वगळण्यात आले होते. आज आणखी एक आरोपी वगळल्याने वगळलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणात ३७ आरोपी शिल्लक राहिले आहेत.

दरम्यान, खटला क्रमांक १२६/१५ मध्ये आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला असून हा खटला न्यायालयाने निकालासाठी राखीव ठेवला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी खटला क्रमांक १२६/१५ साठी ७ एप्रिल २०२६ रोजी, तर खटला क्रमांक १२२/१५ साठी ८ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. आरोपींच्या वतीने ॲड. श्यामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर आणि ॲड. शाम पाटील हे कामकाज पाहत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण, जननी ट्रस्टतर्फे १४ रोजी कर्तृत्ववान महिलांचा गौरव

Spread the love बेळगाव : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजात स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *