बेळगाव : गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात संपन्न झालेल्या डिसेबल चिल्ड्रन साठी तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत जलतरण शिबिराचे आयोजन आबा स्पोर्ट्स क्लबतर्फे करण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसापासून चालू झालेल्या या शिबिरामध्ये 50 मुला-मुलीने भाग घेतला होता. या शिबिराचा संपूर्ण खर्च आबा क्लब तसेच दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने संपन्न केला गेला.
या शिबिरामध्ये भाग घेतलेल्या सर्व जलतरणपटूंना भेटवस्तू तसेच आनंद केटरर्स यांच्याकडूनअल्पोपहार देऊन करण्यात आले. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्री. नितीन जाधव, जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, आबा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष शितल हुलभते, डॉल्फिन ग्रुपचे महादेव केसरकर, विनायक अर्कसाली, याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक श्री. नितीन जाधव यांनी आबा क्लबने हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल संतोष व्यक्त करून मुलांना पुढील प्रशिक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारावी अशी सूचना क्लबच्या सभासदांना तसेच जलतरण प्रशिक्षकांना केली. जायंट्स लक्ष्मण शिंदे यांनी पालकांना आपल्या मुलांना प्रोत्साहन देऊन मुलांच्याकडून कसून प्रॅक्टिस करून घेण्यासाठी नियमितपणे जलतरण तलावावरती घेऊन जावे असे सुचविले. यावेळी अंगविकल आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मयंक हलदर, राष्ट्रीय जलतरणपटू शुभम कांबळे, होम जुळी आरोही, विशाल पवार यांचा उचित गौरव करण्यात आला. या जलतरण शिबिराची संपूर्ण माहिती विश्वास पवार यांनी देऊन सगळ्यांचे आभार व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta