Tuesday , August 25 2026
Breaking News

हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या फॅशन डिझायनर महिलेला टिळकवाडी पोलिसांकडून अटक; ३२ लाख ८६ हजार रुपयांच्या वस्तू जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील श्रीमंत लोकांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या फॅशन डिझायनर महिलेला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर येथील रहिवासी दीपा अवतगी (३३) ही अटक केलेली आरोपी आहे, तर तिचा मित्र शिवानंद मठपती फरार आहे. शिवानंद बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते. तो दीपाला श्रीमंत लोकांबद्दल माहिती पुरवत असे. आरोपी दीपा इंस्टाग्राम आणि फेसबुकद्वारे श्रीमंत लोकांशी ओळख करून नंतर ती अश्लील गप्पा मारत असे आणि त्यांना बेळगाव शहरातील एका लॉजला भेट देण्यासाठी आमंत्रित करत असे. ती लॉजमध्ये येणाऱ्या माणसाला आंघोळ करून परत येण्यास सांगायची आणि तो बाथरूममध्ये जाताच ती बाहेरून दरवाजा बंद करायची. त्यानंतर ती त्याचा मोबाईल, पैसे आणि गाडीच्या चाव्या चोरून पळून जायची. तिची ही दृश्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यानंतर ती बाथरूममध्ये अडकलेल्या व्यक्तीला वेगळ्या नंबरवरून फोन करून पैशाची मागणी करायची. पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी द्यायची, असे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी बेळगाव टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि निरीक्षक परशुराम पूजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीला अटक केली होती. आरोपी महिला सध्या जामिनावर आहे.

पोलिसांनी आरोपींकडून एकूण ३२ लाख ८६ हजार रुपयांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये एक फॉर्च्युनर कार, एक मारुती सुझुकी एस-क्रॉस कार, ११ मोबाईल फोन, एक टॅब, एक डोंगल, तीन गाडीच्या चाव्या आणि १४ हजार रुपये रोख रक्कम समाविष्ट आहे. टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर रस्त्यावरील कचरा तातडीने हटवा; समाज सारथी संघटनेचे मनपा आयुक्तांना निवेदन

Spread the love  बेळगाव : येळ्ळूर रस्त्यावरील केएलई रुग्णालयाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा टाकून त्याचे वर्गीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *