Wednesday , June 17 2026
Breaking News

खानापूर आगाराला ‘शक्ती’ योजनेतून १.७२ कोटी : पंचहमी हमी योजना बैठकीत विविध योजनांचा आढावा

Spread the love

 

खानापूर : तालुका पंचहमी हमी योजनांची मासिक बैठक शनिवारी (ता. ७) तालुका पंचायत सभागृहात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचहमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. यावेळी पंचहमी योजनांच्या विविध विभागीय अधिकाऱ्यांकडून योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

शक्ती योजनेबाबत खानापूर आगाराचे नियंत्रक दुर्गाई यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात शक्ती योजनेंतर्गत ६,०६,६३२ महिला प्रवाशांनी प्रवास केला असून, त्याबदल्यात खानापूर आगाराला १ कोटी ७२ लाख ५३ हजार ४०४ रुपये मिळाले आहेत.

गृहलक्ष्मी योजनेची माहिती देताना सीडीपीओ विक्रम बी. यांनी सांगितले की, तालुक्यात या योजनेचे ६६,३३४ लाभार्थी आहेत. डिसेंबर महिन्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे १२ कोटी २६ लाख ४२ हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

गृहज्योती योजनेबाबत सहायक अभियंता आंगडी यांनी सांगितले की, तालुक्यात ६२,२८४ लाभार्थी असून, जानेवारी महिन्यात १ कोटी ९१ लाख ४१ हजार रुपयांचे वीज बिल माफ करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष कुलकर्णी यांनी शिवाजीनगर येथील मुक्ताबाई व नरेंद्र मयेकर यांच्या घरासमोरील वीजखांबाबाबत नोटीस का देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला. संबंधित खांब मोडकळीस आल्याने तो बदलण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत अंदाजपत्रक तयार करून अर्ज करावा म्हणून नोटीस देण्यात आल्याचे आंगडी यांनी स्पष्ट केले. या बैठकीला सदस्य प्रकाश मदार, प्रियांका गावकर, बाबू हत्तरवाड, विवेक तडकोड, दीपा पाटील, इसाखान पठाण, शांताराम गुरव, राजा कुडाळे, जगदीश पाटील, गोविंद पाटील, युसूफ हारगी, ईओ रमेश मैत्री तसेच व्यवस्थापक श्रीकांत सपटला उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

डिगेगाळी – जटगे परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बैल ठार

Spread the love  खानापूर : ऐन पेरणीच्या हंगामात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याने डिगेगाळी–जटगे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *