Thursday , March 12 2026
Breaking News

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला ५ वर्षांची कोठडी

Spread the love

 

बेळगाव : कारगाडी शिकवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला लैंगिक त्रास देणाऱ्या मन्नूर (ता. जि. बेळगाव) येथील एका इसमाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, विशेष जलदगती पोक्सो न्यायालय -01 बेळगावच्या न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी आज बुधवारी 5 वर्षे कारावासाच्या शिक्षेसह 10,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

शिक्षा झालेल्या इसमाचे नाव रामा मुकुंद तरळे (वय 45, रा. दत्त गल्ली, मन्नूर ता. जि. बेळगाव) असे आहे. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादीने काकती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असून देखील आरोपी गेल्या 3 मार्च 2023 रोजी लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने पीडित मुलीला कारगाडी शिकवण्यास घेऊन गेला.

त्यावेळी त्याने मुलीला घरापासून दूर नेऊन कारगाडी शिकवण्याऐवजी तिच्यावर जबरदस्ती करत लैंगिक त्रास दिला. याप्रकरणी काकती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एच. एम. कबाडे यांनी गुन्हा नोंद करून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक किरणकुमार एस. यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक करण्याबरोबरच साक्षीपुरावे गोळा करून बेळगावच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, विशेष जलदगती पोक्सो न्यायालय -01 मध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते.

या खटल्याची आज अंतिम सुनावणी होऊन न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी एकूण 7 साक्षीदारांच्या साक्ष, 30 कागदोपत्री पुरावे ग्राह्य मानून आरोपी रामा मुकुंद तरळे याला 5 वर्षे कारावासाच्या शिक्षेसह 10,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

त्याचप्रमाणे नुकसान भरपाई दाखल जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाला पीडित मुलीच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पाच वर्षासाठी 1 लाख रुपयांची कायम ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. या खटल्यात सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील ॲड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

हंदीगनूर महालक्ष्मी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळा उत्साहात

Spread the love  बेळगाव : हंदीगनूर येथे श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळ्याचा कार्यक्रम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *