Monday , June 22 2026
Breaking News

हंदीगनूर महालक्ष्मी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळा उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : हंदीगनूर येथे श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळ्याचा कार्यक्रम मंगळवार (दि. १० मार्च) सकाळी उत्साहात पार पडला. जवळपास ५८ वर्षांनंतर हांदीगनूर तसेच परिसरातील म्हाळेनट्टी, बोडकेनहट्टी, होसोळी, कट्टनभावी, कुरिहाळ खुर्द आणि कुरिहाळ बुद्रुक या सहभागी गावांच्या संयुक्त विद्यमाने श्री महालक्ष्मी देवीची यात्रा येत्या १४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव मंडपाच्या उभारणीसाठी मुहूर्तमेढ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे सहायक मलगौडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. मुहूर्तमेढ सोहळ्यानंतर गावातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने कलश पूजन केले. त्यानंतर मनीकेरी गावातून श्री महालक्ष्मी देवीच्या रथासाठी लागणारे साहित्य आणण्यात आले. गावातील विविध देवी-देवतांची विधीपूर्वक पूजा करून भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.
भक्तिमय वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात आणि मिरवणुकीच्या स्वरूपात हे साहित्य मनीकेरी येथून हंदीगनूर गावात आणण्यात आले. यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमास यात्रा समितीचे अध्यक्ष गंगाधर पाटील, कलाप्पा कडोलकर, भैरवनाथ पाटील, दयानंद पाटील, मारुती पाटील, पुंडलिक पाटील, महेश पाटील, आनंद पाटील, किरण पाटील, बाबू तळवार, विजय कांबळे आदींसह सहभागी गावांतील ग्रामस्थ, महिला वर्ग, तरुण मित्रमंडळे, महालक्ष्मी यात्रा समितीचे सदस्य तसेच बाळगोपाळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन मध्ये दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *