Thursday , August 27 2026
Breaking News

माध्यमिक विद्यालय, कर्ले येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ, पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : विश्व भारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय, कर्ले येथील 2025-2026 दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ, पारितोषिक वितरण आणि सेवानिवृत्त चित्रकला शिक्षक श्री. नागेश मारुती पाटील यांचा सत्कार असा तिहेरी कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयराव परशुरामभाऊ नंदीहळी होते. सेवानिवृत्त शिक्षक श्री नागेश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तर सरस्वती प्रतिमेचे पूजन सौ.आशा नागेश पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री. पी. आर. सांबरेकर सर यांनी प्रस्ताविक केले तर पाहुण्यांचा परिचय व स्वागत क्रीडाशिक्षक पी. के. शेळके सर यांनी केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदीहळी यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा दिली आणि वार्षिक परीक्षेला सुद्धा शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती श्री नागेश पाटील यांना निवृत्ती निमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन आणि पुढील जीवनासाठी, आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावर्षीचा आदर्श विद्यार्थी म्हणून दिनेश पाटील तर आदर्श विद्यार्थिनी आकांक्षा देसाई व उत्कृष्ट खेळाडू पवन गोजेकर व नयन गावडे यांची निवड करण्यात आली आणि गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी कर्ले, बहादरवाडी, जानेवाडी, कावळेवाडी, बाकनुर, बेटगिरी, गवळीवाडा गावातील पालक प्रतिष्ठित नागरिक शाळेचे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. के. एम. सातेरी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. के. जी. मेणसे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

एका पिआयडी क्रमांकावर एकच नळ जोडणीची अट रद्द करा; नागरिकांची मनपाकडे मागणी

Spread the love  बेळगाव : एका पिआयडी क्रमांकावर केवळ एकच नळ जोडणी देण्याची जाचक अट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *