Thursday , March 12 2026
Breaking News

बी के मॉडेल हायस्कूलमध्ये ‘पोक्सो’ कायदा जनजागृती कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : येथील बी. के मॉडेल हायस्कूल मध्ये ‘पोक्सो’ कायदा जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून तृतीय सत्र न्यायालय वरिष्ठ न्यायाधीश श्री. आर. एम. शिरूर, शिक्षण इलाख्याचे सर्व शिक्षण अभियान प्रमुख श्रीबसवराज मिलानहट्टी हे उपस्थित होत. मुख्याध्यापक श्री. एस. एन. जोशी अध्यक्षस्थानी होते.
पाहुण्याचे स्वागत करण्यात आल्यानंतर न्यायाधीश श्री. आर. एम. शिरूर यानी मुलाना पोक्सो कायद्याअंतर्गत येणाऱ्या बालविवाह, बाल कामगार, लैगिंक अत्याचार याबद्दल विशेष माहिती दिली आणि विध्यार्थ्यांना जागृत राहण्याची शपथ दिली.
श्री. बसवराज मिलानहट्टी यानीही विद्यार्थांना विशेष माहिती दिली सूत्रसंचालन श्री. टी. आर. भास्करी यानी केले. आभार श्रीमती पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हंदीगनूर महालक्ष्मी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळा उत्साहात

Spread the love  बेळगाव : हंदीगनूर येथे श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळ्याचा कार्यक्रम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *