Thursday , March 12 2026
Breaking News

बेळगावात मटका अड्ड्यावर सीसीबीचा छापा; तीन आरोपींना अटक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका व्यवसायावर सीसीबी पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत तिघा आरोपींना मुद्देमालासहित रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

बेळगावच्या जुन्या मोडका बाजार परिसरातील खंजर गल्लीमध्ये हा मटका अड्डा सुरू होता. सीसीबी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून ही कारवाई केली. या छाप्यात अशोक पवार, गजानन पाटील आणि हवण भातखांडे या तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून एकूण ११,१८० रुपयांची रोकड आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. चौकशीदरम्यान, जमा केलेले पैसे बेळगावमधील फहीम कोतवाल याला पोहोचवत असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीबी पथकाच्या या धाडसी कारवाईचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

अनुजा बाळेकुंद्री यांची शिवा लोहारला ११ हजारांची आर्थिक मदत

Spread the love  माधुरी जाधव फौंडेशनच्या माध्यमातून सुपूर्द केला धनादेश; डोळ्याच्या उपचारासाठी सहकार्याचा हात बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *