Tuesday , March 17 2026
Breaking News

चलवेनहट्टी येथे काजू झाडांना अज्ञाताकडून‌ आग

Spread the love

 

बेळगाव : चलवेनहट्टी येथील गुड्डादेवी मंदिर परिसरात चलवेनहट्टीचे शेतकरी चंद्रकांत आलगोंडी यांच्या शेतातील झोपडीला अज्ञाताकडून‌ मध्यरात्रीच्या सुमारास आग लावण्यात असल्याचे समजते. सदर झोपडीचा वापर शेतीची औजारे व इतर साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत होता. त्यामुळे या झोपडीसह झोपडीतील शेती विषयक साहित्य जळुन खाक झाले आहे. तसेच झोपडीला लागलेल्या आगीत आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या काजूचे झाडे मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये छोटी रोपं देखील मोठ्या प्रमाणात जळाली आहेत. गुड्डादेवी मंदिर परिसरात काजूच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्याने बाहेरली युवकांकडून या ठिकाणी मांसाहारी पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते आणि या पार्टीत दारु पिणे, भांडणं तट्टे करुन बाटल्या फोडणे, सिगारेट ओढणे असे प्रकार तळीराम युवकांकडून केले जातात. नशेत तर्रर्र असलेल्या युवकांकडून सिगारेट ओढलेली थोटके कुठेही फेकले जातात त्यामुळे आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. या भागातील पार्ट्यांचे आयोजन करणारे हुल्लडबाज युवक शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरली आहे. तर या भागात पोलिस प्रशासनाच्या वतीने गस्त वाढवावी जेणेकरून तळीरामाना आळा बसेल, अशी मागणी चलवेनहट्टी, अगसगे, अतिवाड व बेकीनकेरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने प्रॉपर्टी परेडद्वारे चोरीच्या मालाचे वितरण

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यांनी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये जप्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *