Tuesday , September 1 2026
Breaking News

मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन; लढवय्या नेता हरपला!

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले असून त्यांच्या जाण्याने सीमाभागावर शोककळा पसरली आहे. सीमा लढ्यातील एक खंबीर नेतृत्व हरपल्याची भावना कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे. दीपक दळवी हे मागील काही दिवसांपासून आजारी होते त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. सीमा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून त्यांचा सीमा लढ्यात सक्रिय सहभाग होता. दीपक दळवी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या दीपक दळवी यांच्या निधनाने विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे आज सायंकाळी 7.30 वाजता त्यांच्यावर शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

वडगाव जनावरांचा दवाखाना स्टाफअभावी बंद; शेतकऱ्यांची गैरसोय

Spread the love  वडगाव : जुने बेळगाव व वडगाव परिसरातील हजारो जनावरांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *