Friday , March 20 2026
Breaking News

गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री समादेवी देवस्थानात वार्षिक गाऱ्हाणे; मान्यवरांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : श्री समादेवी देवस्थान, शहापूर तर्फे गुढीपाडव्याच्या निमित्ताने वैश्यवाणी समाजाचे आराध्यदैवत श्री समादेवीला वार्षिक गाऱ्हाणे घालण्यात आले. समाजाच्या सुख-शांतीसाठी पार पडलेल्या या धार्मिक कार्यक्रमानंतर कोसंबीर व पन्ह्याच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले.

याचबरोबर वार्षिक शिमगोत्सव व नववर्ष स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

उत्कृष्ट कार्याबद्दल बाल गणेश उत्सव मंडळ, नार्वेकर गल्ली शहापूरचे अध्यक्ष सागर पाटील, श्री समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज बेळगावचे अध्यक्ष महादेव गावडे तसेच महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा अंजली किनारी यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमावेळी शहापूर वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष श्रीधर कुदळे, कार्याध्यक्ष गजानन गावडे, सचिव विशाल मुरकुंबी, उपसचिव अमित गावडे, खजिनदार गंगाधर कुदळे, उपखजिनदार विराज मुरकुंबी, विश्वस्त मधुसूदन किनारी, चंदन मुरकुंबी, गौरव अनगोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पुजारी आणि मंदिर ट्रस्टी यांच्या हस्ते आरतीने झाली. तसेच समाजातील अनेक मान्यवर व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पिरनवाडी येथील एकाला गांजा विक्री प्रकरणी अटक

Spread the love  बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैतून माळ येथे गांजा विक्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *