Sunday , July 26 2026
Breaking News

न्यायाधीश प्रियांका राजगोळकर यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : शाहूनगर, बेळगाव येथील रहिवासी प्रियांका राजगोळकर यांची दिवाणी न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल शाहूनगरवासियांतर्फे अभिनंदन करून नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला.

शाहूनगर येथील रहिवासी प्रियांका राजगोळकर -बेकवाडकर यांनी दिवाणी न्यायाधीश परिक्षा उत्तम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. या पद्धतीने न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल प्रियांका यांचे त्यांच्या घरी जाऊन ॲड. मोहन नंदी व ॲड. मारुती कामान्नाचे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच दिवाणी न्यायाधीश बनलेल्या प्रियांका यांचा शाहूनगर येथील रहिवाशांच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन खास सत्कार केला. सत्काराबद्दल प्रियांका राजगोळकर -बेकवाडकर यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी विजय सांबरेकर, क्षितिज सांबरेकर आदींसह स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *