Monday , September 21 2026
Breaking News

पिरनवाडी येथील एकाला गांजा विक्री प्रकरणी अटक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैतून माळ येथे गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून १ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त केला आहे.महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमा भागातून गांजा आणून बेळगावमध्ये विक्री केली जात होती. सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जैतून माळ येथील सार्वजनिक ठिकाणी छापा टाकून पिरनवाडीतील मानस मनोहर कदम याला ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान रितिक पाटील हा आरोपी पळ काढण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.अटक करण्यात आलेल्या मानस कदम याच्याकडून ५५ हजार रुपये किमतीचा १ किलो १०० ग्रॅम गांजा, डिजिटल वजन काटा आणि मोबाईल असा एकूण ६३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा गांजा मध्य प्रदेशातील सुनील नावाच्या व्यक्तीकडून पुरवला जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी पथकाचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *