Friday , March 20 2026
Breaking News

येळ्ळूर म. ए. समितीच्यावतीने दीपक दळवी यांची उद्या शोकसभा

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष सीमाभागाचे ज्येष्ठ नेते माननीय कै. दीपक अर्जुनराव दळवी यांचे निधन झाले. त्यानिमित्ताने शनिवार दि. 21 रोजी
ठीक 7-30 वा. येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने श्री चांगळेश्वरी मंदिर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या शोकसभेला आजी – माजी जि. प. सदस्य, ता. पंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, येळ्ळूर येथील युवक संघटना, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी एपीएमसी सदस्य श्री. वामनराव पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पिरनवाडी येथील एकाला गांजा विक्री प्रकरणी अटक

Spread the love  बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैतून माळ येथे गांजा विक्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *