Sunday , April 5 2026
Breaking News

बेळगावात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली उद्योजकाला कोटींचा गंडा

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमध्ये एका वृद्ध उद्योजकाला सायबर फसवणूक करणाऱ्यांनी लक्ष्य केले. त्यांनी त्याला मनी लॉंड्रिंग प्रकरणात अडकण्याची भीती दाखवून तब्बल १५ कोटी ४५ लाख रुपये उकळवले. आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणून दाखवून व्हिडिओ कॉलवरून ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी दिली आणि उद्योजकाकडून रक्कम हप्त्यांमध्ये घेतली.

बेळगाव सायबर क्राईम पोलिसांच्या तपासात समोर आले की, या लुटीची रक्कम देशभरातील सुमारे ३९० बँक खात्यांमध्ये काही मिनिटांतच वळवण्यात आली होती. शेकडो ‘म्युचुअल अकाउंट्स’चा वापर करून चोरट्यांनी आधीच ९५ टक्के रक्कम काढून घेतली होती.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सीआयडीकडे याची तक्रार केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी ९० लाख रुपये जप्त करण्यात यश मिळवले असून, उर्वरित रकमेसाठी ३९० खात्यांची माहिती संकलित केली जात आहे. कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे, अशा प्रकारचे फोन आल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे भूषण बोरसे यांनी नागरिकांना सुचवले आहे. हायटेक चोरट्यांच्या या फसवणुकीमुळे सध्या सीमावर्ती भागात मोठी खळबळ उडाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावमध्ये मटका अड्ड्यांवर छापे : तिघांना अटक

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर पोलिसांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *