Sunday , July 26 2026
Breaking News

बोरगाव येथील म्हैस पळविण्याच्या शर्यतीत कोल्हापूरच्या सूर्यवंशींची म्हैस प्रथम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : हनुमान जयंतीनिमित्त बोरगाव येथील वीर बजरंगबली सेवा संघातर्फे दुचाकी मागून म्हैस पळविण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोल्हापूर येथील निलेश सूर्यवंशी यांच्या म्हैशीने प्रथम क्रमांक मिळून १० हजार १ रुपयांचे रोख बक्षीसव ५ फुटी ढाल मिळविले. अनुज अण्णासाहेब हवले व भरत हवले यांच्या नेतृत्वाखाली वीर बजरंगबली सेवा संघातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी अनुज हवले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत सहदेव हुलवान -मिरज यांनी द्वितीय व विक्रम लाड -रशिवडे यांच्या म्हैसीने तृतीय क्रमांक मिळविले. त्यांना अनुक्रमे ७ हजार १ व ५ हजार एक रुपयांचे रोख बक्षीस आणि तीन फुटी व दोन फुटी ढाल देण्यात आली. शहरात प्रथमच स्पर्धेचे आयोजन केल्याने या स्पर्धेसाठी मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमास विद्याधर अम्मन्नावर, शिवाप्पा माळगे, भाऊसाहेब पाटील, शिशिर सातपुते, रमेश पाटील, अमित माळी, गुंडू गोरवाडे, प्रकाश पाटील, अर्जुन पाटील, बाहुबली हवले, राहुल भिक्कू यांच्यासह कार्यकर्ते आणि शर्यंती शौकीन उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *