Sunday , July 26 2026
Breaking News

नाथ पै चौक ते बसवेश्वर चौक डबल रोडवर गतिरोधक घालण्याची नागरिकांची मागणी

Spread the love

 

बेळगाव : नाथ पै चौक ते बसवेश्वर चौक डबल रोड येथे कार आणि दुचाकीची धडक होऊन अपघात झाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसवेश्वर चौक डबल रोड येथे गतिरोधक बसविण्यात आला नाही त्यामुळे वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवित असतात त्यामुळे या रस्त्यावर वारंवार लहानमोठे अपघात घडत आहेत. ही बाब लक्षात घेत नवी गल्ली, भारत नगर आणि नाथ पै – बसवेश्वर चौक डबल रोड येथील नागरिकांनी 2025 मध्ये महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांना निवेदन देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्या निवेदनात स्पष्ट उलेख करण्यात आला होता की, नव्याने रुंद केलेल्या डबल रोडवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या रस्त्यावर अतिशय वेगाने वाहने धावत असतात ज्यामुळे या रस्त्यावर वारंवार लहानमोठे अपघात घडत आहेत. हा परिसर अपघात प्रणवक्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. एखादा मोठा अपघाताचा धोका निर्माण होण्यापूर्वीच या रस्त्यावर दोन्ही बाजूने गतिरोधक घालण्यात यावेत अशी मागणी करणारे निवेदन वर्षभरापूर्वी महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले होते. परंतु पालिका प्रशासनाने अद्याप भारतनगर परिसरातील नागरिकांच्या या मागणीकडे लक्ष दिले नाही. आज या रस्त्यावर अपघात घडल्याने भविष्यात उद्भवणारा धोका टाळण्यासाठी या रस्त्यावर तत्काळ गतिरोधक बसवून वाहन पार्किंगचे नियम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पालिका प्रशासनाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी डबल रोडवर गतिरोधक बसवून वाहतूक सुरळीत करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *