
येळ्ळूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी श्री. प्रकाश मरगाळे यांची निवड झाल्याबद्दल येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
वामनराव पाटील, दुद्दापा बागेवाडी आणि प्रकाश अष्टेकर यांच्या हस्ते शाल आणि वृक्षाचे रोपटे देऊन प्रकाश मरगाळेसाहेब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्ता उघाडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्य निष्ठेने करणाऱ्या धाडसी कार्यकर्त्याला संधी मिळाल्यामुळे सीमा लढ्याला एक नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नूतन अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे यांनी मी सर्वांना सोबत घेऊन कार्य करीन असे सांगून येळ्ळूरचे सीमालढ्यातील योगदानाबद्दल कौतुक केले.
यावेळी राजू पावले, कृष्णा शहापूरकर, प्रकाश मालुचे, एम. वाय. घाडी, शिवसंत संजय मोरे, दयानंद उघाडे, राकेश परीट, महेश जुवेकर, बंडू मजुकर, यल्लुपा पाटील, सतीश देसुरकर, नेताजी गोरल आणि महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभागचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta