Sunday , April 5 2026
Breaking News

बेळगावात सीएनजी गॅस तुटवड्यामुळे ऑटोरिक्षा चालक संकटात

Spread the love

 

बेळगाव : व्यावसायिक गॅस सिलेंडर तुटवड्यासोबतच आता बेळगावकरांना सीएनजी गॅस तुटवड्याला देखील सामोरे जावे लागत आहे. बेळगाव शहरात रिक्षासाठी वापरला जाणाऱ्या सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून रिक्षा चालकांना आपल्या ऑटो रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. बेळगाव शहरातील सर्व सीएनजी गॅस पंपांवरील गॅस संपला असून केवळ आरटीओ सर्कल येथील एका गॅस पंपावर गॅस शिल्लक आहे त्यामुळे सीएनजी गॅस पंपावर शेकडो ऑटोरिक्षा थांबून आहेत. सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवत असताना गॅसच्या दरात झालेली वाढ यामुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. मागील दोन दिवसांपासून रिक्षा चालकांना गॅस तुटवट्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तसेच गॅस वाढीमुळे ऑटो चालकांना प्रति किलो 50 रुपये ऐवजी 80 रुपये गॅस दर द्यावा लागत आहे. गॅस दरवाढ आणि तुटवड्यामुळे ऑटो रिक्षा चालक आर्थिक संकटात सापडला आहे. आपला उदरनिर्वाह कसा होणार याची चिंता ऑटो रिक्षा चालकांना लागली आहे. गॅस तुटवडा यावर सरकारने तत्काळ मार्ग काढावा अशी मागणी बेळगाव शहरातील रिक्षा चालकांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावमध्ये मटका अड्ड्यांवर छापे : तिघांना अटक

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर पोलिसांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *