Sunday , April 5 2026
Breaking News

बेळगावात सीएनजी व ऑटो एलपीजी गॅस मुबलक : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात ऑटो रिक्षांसाठी सीएनजी आणि ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा असल्याची अफवा पसरल्यामुळे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्टीकरण देत कोणताही गॅस तुटवडा नसल्याचे सांगितले आहे.
१ एप्रिल रोजी विविध माध्यमातून प्रसारित झालेल्या वृत्तानंतर अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने शहरातील एकूण सहा गॅस पंपांची पाहणी केली. या तपासणीत सर्व पंपांवर सीएनजी आणि ऑटो एलपीजी गॅस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, आरटीओ सर्कल येथील ‘शिल्पा गो गॅस’ पंपावर गॅस भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘नोझल’मध्ये बिघाड झाल्याने काही काळ अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे ऑटो चालकांना गॅस मिळण्यात अडथळे आले होते. मात्र, संबंधित पंप मालकांनी नोझलची दुरुस्ती करून समस्या पूर्णपणे सोडविल्याचे लेखी स्वरूपात प्रशासनाला कळवले आहे.

जिल्ह्यात कुठेही सीएनजी किंवा ऑटो एलपीजी गॅसची कमतरता नसून ऑटो चालकांनी कोणतीही अफवा किंवा भीती बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावमध्ये मटका अड्ड्यांवर छापे : तिघांना अटक

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर पोलिसांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *