
बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील श्री शिवाजी व्यायाम शाळा येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरी करण्यात आली. यावेळी गल्लीतील पंचमंडळ व व्यायाम शाळेचे व्यवस्थापकीय मंडळ यांच्या वतीने हनुमान प्रतिमेची सुरुवातीस भक्तिभावाने पूजा करण्यात आली. पाळणा व आरती झाल्यानंतर श्रीफळ वाढवण्यात आले. या कार्यक्रमात माजी महापौर श्री. मालोजी अष्टेकर, अनंतराव पाटील, बाबुराव कुट्रे, मनोहर बडवाणाचे पप्पू उर्फ अनिल जाधव, महादेव बडवाणाचे, सुरेश धामणेकर, मोहन बडवाणाचे, सचिन कामुले, सदानंद बडवाणाचे, किरण सांबरेकर, जगन्नाथ कंग्राळकर, उदय कलघटगी, सुजय शंभूचे, व्यायामपट्टू आणि नागरिक हजर होते.
Belgaum Varta Belgaum Varta