ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा पुरस्कार वितरण सोहळा
सावंतवाडी : ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम सुरू आहे. यासोबतच सामाजिक क्षेत्रात चांगल काम करणाऱ्या मान्यवरांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे काम ज्ञानदीप करत आहे. ज्ञानदीपचे काम युवा पिढीला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केले.
ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या माध्यमातून होणारा, समाजातील विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या कोकणच्या सुपुत्रांचा सत्कार करताना अभिमान वाटला. आपला पुरस्कार म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रेरणा आहे. १६ वर्ष या संस्थेला झाली असून ही संस्था आता तरुण झाली आहे. त्यामुळे ही संस्था नव्या जोशानं पुढं जाईल, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष, कोकणसाद संपादक सागर चव्हाण यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी शहरातील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या सन २०२० च्या पुरस्कारांचे आज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दैनिक कोकणसाद संपादक सागर चव्हाण होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री प्रवीण भोसले, पोलीस निरीक्षक शंकर कोरे, सेवानिवृत्त पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. आर. परब, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी व अध्यापक विद्यालय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे, ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे संस्थापक वाय. पी. नाईक, अध्यक्ष जावेद शेख, कार्याध्यक्ष निलेश पारकर आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्ञानदीप शिक्षण मंडळाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदन घोगळे, कारिवडे येथील प्राथमिक शिक्षक मनोहर परब, कुडाळ तालुक्यातील घोडगे येथील जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्येकर, रक्तदाता चळवळीचे प्रणेते देव्या सुर्याजी, सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर पराडकर, बांदा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अन्वर खान व केसरी येथील युवा कार्यकर्ता विलास जंगले यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित असलेले सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करीत ज्ञानदीप शिक्षण मंडळाच्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.
मान्यवरांत डॉ. एम. आर. परब, म .ल. देसाई, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, अनिल राणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये नंदन घोगळे, सुधीर पराडकर, अन्वर खान, लॉरेन्स मान्येकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आले. यावेळी सावंतवाडीची युवा गायिका विधीता केंकरे हिने ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले.
संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात ज्ञानदीपच्या कार्याचा आढावा घेऊन, भविष्यात राबविले जाणाऱ्या उपक्रमांबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या समाजाभिमुख व्यक्तींचा गौरव व्हावा, त्यांना भविष्यात कार्य करण्याची उमेद या पुरस्कारातून मिळावी तसेच कौतुकाची थाप मिळावी. याच भावनेतून हे मंडळ कार्यरत आहे, असे विचार व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार सहसचिव विनायक गावस यांनी मानले.
कार्यक्रमास कळसुलकर हायस्कूल मुख्याध्यापक एन. पी. मानकर, माजी मुख्याध्यापक एस. आर. मांगले, एस. जी. साळगावकर, प्रदीप सावंत, कवी विठ्ठल कदम, आर. व्ही. नारकर, व्ही. टी. देवण, सलीम तकीलदार, वैभव केंकरे, सुनील नेवगी, गजानन नानचे, पांडुरंग काकतकर, डॉ. पराडकर, कळसुलकर, एस. पी. कुळकरणी, अनिल कांबळे, बी. बी. चव्हाण, डॉ. कविता पराडकर, डॉ. निकिता सूर्याजी, सौ. नजमा खान आदी उपस्थित होते.