
बेळगाव : बेळगाव शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम राबवली असून, मटका जुगार आणि अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. एपीएमसी आणि खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
बेळगावमधील मार्कंडेय नगर भागात मटका खेळणाऱ्या शुभम व्यंकटेश रेड्डी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. एपीएमसी पोलीस ठाण्याचे पीएसआय एस. आर. मत्तट्टी आणि पथकाने ही कारवाई केली. चौकशीत त्याने किशन सुरेश भजंत्री याला पैसे पुरवत असल्याची कबुली दिली असून, या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत, खडेबाजार पोलीस ठाण्याचे पीएसआय आनंद आदगोंडा आणि कर्मचाऱ्यांनी अंमली पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्या साई विनायक प्रधान याला अटक केली. संशयिताला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यशस्वी मोहीम राबवणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त तसेच उपायुक्तांनी कौतुक केले आहे. अवैध धंद्यांविरुद्ध ही कारवाई यापुढेही सुरू राहील, असे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta