Sunday , April 5 2026
Breaking News

बेळगावमध्ये मटका अड्ड्यांवर छापे : तिघांना अटक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळवणाऱ्या अड्ड्यांवर मार्केट आणि काकती पोलीस ठाण्याच्या पथकांनी छापे टाकून तिघा आरोपींना रोख रकमेसह रंगेहात अटक केली.

बेळगावमधील देशपांडे गल्लीमध्ये सार्वजनिक रित्या मटक्याचे पैसे स्वीकारणाऱ्या मंजुनाथ यल्लाप्पा तिगडी याला काकती पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरूर आणि त्यांच्या पथकाने अटक केली असून, याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत मण्णूरमधील डाएट कॉलेज जवळ मटका जुगार चालवणाऱ्या बजरंग अशोक कदम आणि अजित मारुती डोणकरी या दोघांना काकतीचे पोलीस उपनिरीक्षक मृत्युंजय मठद यांच्या पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून रोख रक्कम आणि मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून, कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शहरातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी विशेष सूचना दिल्या होत्या. या मोहिमेत कर्तव्यदक्षता दाखवणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका बुकी आणि गांजा ओढणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम राबवली असून, मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *