
उद्यमबाग आणि महाद्वार रोड परिसरात पोलिसांची कारवाई
बेळगाव : शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत उद्यमबाग आणि मार्केट पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करून असामान्य वर्तन करत नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.
उद्यमबाग औद्योगिक परिसरात गांजाचे सेवन केल्याप्रकरणी मंजुनाथ मोहनसा धोंगडी (वय ३२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कारवाई करण्यात आली. ही कारवाई उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पीएसआय पी. जी. गंधाव्वागोळ यांच्या पथकाने केली.
तसेच, मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाद्वार रोड परिसरात गांजाचे सेवन करून गैरवर्तन करणाऱ्या सूरज विठ्ठल गुंडेकर (वय २२) याला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सी.एच.सुरेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्परतेने कारवाई करणाऱ्या पोलिसांचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta