
कुद्रेमानी (प्रतिनिधी) : हनुमान जयंतीनिमित्त शिनोळी बु. येथे आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेत कुद्रेमानीच्या मल्लांनी आपल्या दमदार कामगिरीने आखाडा गाजवला. पै. शुभम शटुप्पा काकतकर यांनी ११ नंबरची कुस्ती जिंकून विजेतेपद पटकावले, तर आकर्षक चषक कुस्ती स्पर्धेत पै. शुभम जोतिबा बडसकर यांनी विजय मिळवला.
या उल्लेखनीय यशाबद्दल कुद्रेमानी ग्रामस्थांतर्फे दोन्ही विजेत्या मल्लांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
सत्कार प्रसंगी रवी पाटील, दिपक पाटील, धोडिंबा पाटील, बाळू कदम, सुरेश पाटील, अरुण देवण, नाना पाटील, शिवाजी गुरव, महादेव मराठे, शंकर पाटील, गावडू पाटील, परशराम काकतकर, पिंटू कागणकर, शिवाजी यल्लापा गुरव व निलेश पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta