Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कार्यवाह सुरेन्द्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.

विश्वास धुराजी व बाळकृष्ण बिर्जे यांनी प्रार्थना सादर केली. तर रविंद्रनाथ जुवळी, अश्विनी पाटील, नारायण कोरडे, डॉ.श्रेयास चौगुले, जगमोहन अगरवाल, भारती गावडे , सुरेन्द्र व योगिनी देसाई, सुरेश खानोलकर, अशोक लोकूर, अशोक कदम, विजय वाईगडे व अरविंद मुतगेकर यांनी मराठी, हिंदी व कन्नड गाणी सादर केली तर भरत गावडे व चंद्रशेखर गायकवाड यांनी कविता सादर केली.
यावेळी सतीश देशपांडे, अनंत सावंत, ब्रम्हानंद तोरालकर, वसंत सावंत, भरत व भारती गावडे, अशोक काडापूर, शिवकुमार हुबरवाडी व गोपाळ देशपांडे या नूतन सभासदांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ सदस्य अनंतराव हलगेकर यांनी संघाला वीस हजार रूपयांची देणगी दिली.
सुरेन्द्र देसाई यांनी स्वागत केले तर आभार विनिता बाडगी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *