Sunday , July 26 2026
Breaking News

श्रावकरत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील जयंतीनिमित्त बोरगावमध्ये ११ एप्रिल रोजी शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्रावकरत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील (दादा) यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता.११) अरिहंत उद्योग समूह, दक्षिण भारत जैन सभेचे ग्रॅज्युएशन असोसिएशन व भगवान वृषभनाथ कृषी कमिटीच्या संयुक्त विद्यमानाने शेतकऱ्यांसाठी किफायतशीर खर्चात उत्पादनवाढीबाबतची महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कृषी विज्ञान संत अंकुश पाटील हे शेतकऱ्याना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती दक्षिण भारत सभेचे उपाध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांनी दिली.
बोरगांव येथे आयोजित बैठकीत अभिनंदन पाटील म्हणाले, स्वर्गीय रावसाहेब पाटील यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या ८२ व्या जयंती निमित् शेतकऱ्यांसाठी येथील अरिहंत सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही कार्यशाळा होणार आहे. कमी खर्चात शेतीतील ऊत्पादन वाढ कशी करता येईल, शेती फायदेशीर कशी होईल, घरच्या घरी कृषी खते व औषधी कसे बनवता येईल याचे प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील उपस्थित राहणार असून सहकार्यारत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. दक्षिण भारत जैन सभेचे सर्व पदाधिकारी, परिसरातील साखर कारखान्याचे संचाल, ग्रॅज्युएशन असोसिएशन, भगवान ऋषभनाथ कृषी समिती व अरिहंत उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.शेतीची खते व विविध किटनाशकांबद्दलही माहिती दिली जाणार आहे. तरी परिसरातील शेतकऱ्यांनी या कार्यशाळेची लाभ घेण्याचे आवाहन अभिनंदन पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *