Monday , September 21 2026
Breaking News

सिद्धार्थ ढोणे महाराजांच्या भाकणूकीने बेनाडी बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता रविवारी (ता.५) विविध कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात रविवारी झाली. यावेळी आयोजित भाकणुकीला बेनाडीसह परिसरातील भाविक उपस्थित होते.
शनिवारी (ता. ४) सायंकाळी माळावरील बिरदेव मंदिरात पालखी नेऊन आंबील-भाताचा नैवेद्य दाखविला. रात्री सिध्देश्वर देवालयात वालंग जमवून ढोल वादनात बिरदेव पालखीची मिरवणूक काढली. रविवारी (ता.५) सकाळी श्रींच्या पालखीची गावातील प्रमुख मार्गावरून ढोल वादनात दूध -साखर मिरवणूक काढली. सायंकाळी वाघापूर येथील सिद्धार्थ ढोणे महाराजांची भविष्यवाणी झाली. तिसरे महायुद्ध होईल. समान नागरिक कायदा अस्तित्वात येईल. राजकारणात मोठी ढवळाढवळ होऊन गोंधळाची स्थिती निर्माण होईल, युद्ध सुरूच राहील. ३३ कोटी देवांचा दरबार बंद पडला आहे. महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल. दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल. मुस्लिम राष्ट्र आपापसात लढतील. भारत हिंदू राष्ट्र बनेल. देशाच्या तापमानात वाढ होईल. वन्यजीव आणि औषधी वनस्पती नष्ट होईल असे भाकित वाघापूर येथील सिद्धार्थ ढोणे महाराज यांनी केले. रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कमिटीचे अध्यक्ष अविनाश हजारे, कल्लाप्पा भानसे, पुंडलिक ढवणे, अप्पासाहेब बन्ने, मायाप्पा बन्ने, अण्णा हजारे, ग्रामपंचायत अध्यक्ष सत्याप्पा हजारे, जकाप्पा हजारे, लक्ष्मण जानकर, मारुती लवटे, एस. एस. हजारे, दत्ता लवटे, अप्पासाहेब हजारे, नवलाप्पा बोते, शिवाजी हजारे, संजय हजारे, महादेव लवटे, रावसाहेब बन्ने, भागोजी बन्ने यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.
——————————————————————–
शिक्षक बंधूतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
बोरगाव हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक डी. एस. लवटे आणि सावर्डे येथील भा. रा. यादव हायस्कूलचे विज्ञान शिक्षक एस. एस. हजारे या शिक्षक बंधू तर्फे येथील धनगर समाजातील जेष्ठ नागरिकांचा भगवान ढोणे महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये भरमा हजारे, विठ्ठल ढवणे, कल्लाप्पा हजारे, अप्पाजी लवटे, मल्लप्पा ढवणे, काशिबा हजारे, राघु बन्ने, शिवराम बोते यांचा समावेश होता.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *